.माझी स्वयंलिखित कविता.
*कोरोनाच्या खोडीचा बिमोड*
कोरोना जर कधी माझ्या
शाळेमध्ये आला ,
शप्पथ सांगतो लेका चांगली
अद्दल घडविण त्याला ।
मुख्याध्यापकांनी सोडले तरी
मी नाही सोडणार ,
साऱ्या जगाला त्रास दिला म्हणून
त्याची पाठ मात्र फोडणार ,
हात वर करून त्याला
बेंच वर उभं करणार ,
खोड मोडेपर्यंत त्याला
पाढे म्हणायला लावणार
आगाऊपणा केला म्हणून
बैठक मारायला सांगणार
तरी नाही ऐकला तर
त्याला कोलदांडा ही घालणार
कडक चाचणी घेऊन त्याला
अप्रगतच मध्ये ठेवणार
उपचारात्मक अध्यापन करून
सरळ वाटेवरच आणणार
साथ द्यालया सोबत त्याचे साथीदार शाळेत येतील ,
मी सॅनिटायजर अन मास्क घातल्यास ते काय करतील?
विद्यार्थ्यांना त्याच्यापासून
दूर मी ठेवणार
किमान 1 मीटर अंतरावर
विद्यार्थांना बसवणार
सारेजण शाळेत सॅनिटायझर
अन मास्क घालून येतील ,
सांगितलेल्या नियमाप्रमाणे
सोशल डिस्टन्स पाळतील
एवढ सारं केल्यास त्याची
खोड तर मोडेलच
अन तो पर्यंत मदतीला
WHO ची लस तर येईलच
शहाणा असेल तो तर त्याला
शाळेत येऊ नकोस म्हणून सांगा ,
कधी कुठे चुकून घुसला तर
फक्त
गणाचार्य गुरुजींचे नाव सांगा
मुक्तकवी
*श्री. शिवसांब गणाचार्य*
सहशिक्षक
जि. प. प्रा.शाळा हिप्परगा शहा
ता. कंधार जि. नांदेड
9765725090
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*कोरोनाच्या खोडीचा बिमोड*
कोरोना जर कधी माझ्या
शाळेमध्ये आला ,
शप्पथ सांगतो लेका चांगली
अद्दल घडविण त्याला ।
मुख्याध्यापकांनी सोडले तरी
मी नाही सोडणार ,
साऱ्या जगाला त्रास दिला म्हणून
त्याची पाठ मात्र फोडणार ,
हात वर करून त्याला
बेंच वर उभं करणार ,
खोड मोडेपर्यंत त्याला
पाढे म्हणायला लावणार
आगाऊपणा केला म्हणून
बैठक मारायला सांगणार
तरी नाही ऐकला तर
त्याला कोलदांडा ही घालणार
कडक चाचणी घेऊन त्याला
अप्रगतच मध्ये ठेवणार
उपचारात्मक अध्यापन करून
सरळ वाटेवरच आणणार
साथ द्यालया सोबत त्याचे साथीदार शाळेत येतील ,
मी सॅनिटायजर अन मास्क घातल्यास ते काय करतील?
विद्यार्थ्यांना त्याच्यापासून
दूर मी ठेवणार
किमान 1 मीटर अंतरावर
विद्यार्थांना बसवणार
सारेजण शाळेत सॅनिटायझर
अन मास्क घालून येतील ,
सांगितलेल्या नियमाप्रमाणे
सोशल डिस्टन्स पाळतील
एवढ सारं केल्यास त्याची
खोड तर मोडेलच
अन तो पर्यंत मदतीला
WHO ची लस तर येईलच
शहाणा असेल तो तर त्याला
शाळेत येऊ नकोस म्हणून सांगा ,
कधी कुठे चुकून घुसला तर
फक्त
गणाचार्य गुरुजींचे नाव सांगा
मुक्तकवी
*श्री. शिवसांब गणाचार्य*
सहशिक्षक
जि. प. प्रा.शाळा हिप्परगा शहा
ता. कंधार जि. नांदेड
9765725090
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment