नांदेड जिल्हा
नांदेड जिल्हा विशेष
इतिहास
नांदेड जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी[संपादन]
नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.
नांदेडात शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड
संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्यात
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व
तांत्रिक महाविद्यालय या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत.
नांदेड जिल्ह्याची सामाजिक व
धार्मिक स्थिती[संपादन]
नांदेड जिल्ह्यात विविध जाती-धर्माचे
लोक वास्तव्यास आहे. हे शहर व्यापारी पेठ म्हणूनही प्रसिध्द आहे. हिंदू, मुस्लीम, बौध्द, शीख या धर्मातील लोकांची संख्या अधिक असूनजैन व पारशी धर्मातील
लोकांची संख्या जेमतेम (नगण्य) आहे. नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले
आहे. यामुळे हे शहर धार्मिक क्षेत्रही आहे. शहरात नृसिंहाचे मंदिर आहे. शिखांचे
दहावे गुरु श्रीगुरु गोविंदसिंघजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा प्रसिध्द
आहे. शिवाय जिल्ह्यातील माहूर या तालुक्याच्या ठिकाणी रेणूका मातेचे मंदिर आहे.
माहूर परिसरात लेण्या आहेत. कंधार येथे प्राचीन भूईकोट किल्ला आहे. त्याठिकाणी एक
दर्गाही आहे. दरवर्षी कंधारचा उरुस या नावाने फार मोठी जत्रा भरते. लोहा तालुक्यात
माळेगाव येथे मल्हारी म्हाळसाकांताचे भव्य मंदिर आहे. दरवर्षी याही ठिकाणी फार
मोठी जत्रा भरते. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून या जत्रेचे आकर्षण असते.
बिलोली या तालुक्याच्या ठिकणी जुने मस्जिदीवरील कोरीव कला व दगडी पुंगराचे कोरीव
काम प्रेक्षणीय आहे. देगलूर येथील होहल भवानी मंदिर, धुंडा महाराज देगलूरकरची वारकरी संप्रादायाची ध्वजा हे प्रसिध्द
आहे. नांदेड जिल्ह्यात उनकेश्वर धार्मिक पर्यटन स्थळ आहे. तेथील गरम पाण्याचे झरे
हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. अशा रितीने सामाजिक व धार्मिक गौरवशाली
परंपरा नांदेड जिल्ह्यास लाभलेली आहे. [१]
नांदेड जिल्ह्यातील राजकीय स्थिती[संपादन]
जिल्ह्यात नांदेड लोकसभा मतदार संघ
स्वतंत्र आहे. नांदेड लोकसभा मतदार संघ अंतर्गत उत्तर नांदेड, दक्षिण नांदेड, देगलूर, भोकर, नायगाव, मुखेड, माहूर, किनवट व कंधार हे विधानसभा मतदार संघ येतात. नांदेड जिल्ह्यात एकूण
९ विधानसभा मतदार संघ आहेत. नांदेड जिल्ह्याने आजपर्यंत देशातील राजकीय नेतृत्व
घडविलेले आहे. कै. शंकरराव चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. मा. अशोकराव चव्हाण हे देखील
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेले आहेत. सध्या मा. डी. पी.
सावंत हे राज्य मंत्री, उच्च व तंत्र व शिक्षण विभाग हे पद
भूषवित आहेत. अशाप्रकाचे राजकीय नेतृत्व या 'नांदेड जिल्ह्याने तयार केलेले आहे.
नांदेड जिल्ह्याचे भौगोलिक स्थान[संपादन]
नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची
लोकसंख्या इ.स २००१च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे. नांदेड जिल्ह्यात
सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, मांजरा, आसना, मन्याड व पैनगंगा. नांदेड हे नाव श्री शंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले
असल्याचे सांगण्यात येते.
नांदेड जिल्ह्यातील तालुके[संपादन]
अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड (तालुक्याचे ठिकाण), नायगाव, उमरी
श्री गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा, माहुरची रेणुकादेवी (शक्तिपीठ), बिलोली मशिद, कंधारचा किल्ला, लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा, सहस्रकुंड चा धबधबा किनवट तालुका, देगलूर तालुक्यातील सिद्धेश्वर मंदीर
(होट्ट्ल), नांदेडचा किल्ला व मुखेड येथील शिवमंदिर
नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक स्थिती[संपादन]
नांदेड जिल्हा हा शैक्षणिक दृष्ट्या
महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. १९५८ मध्ये औरंगाबाद येथे
मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. १९८४ पासून नांदेड येथे औरंगबाद विद्यापीठाचे
उपकेंद्र कार्यरत होते. १७ सप्टेंबर १९९४ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ. जनार्धन वाघमारे, दुसरे कुलगुरु डॉ. शेषेराव सुर्यवंशी, तिसरे कुलगुरु डॉ. धनंजय येडेकर, २००८ पासून मे २०१३ पर्यंत डॉ.
सर्जेराव निमसे हे कुलगुरु म्हणून कार्यरत होते. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र
नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चार जिल्ह्याचे आहे. विद्यापीठ कक्षेत सध्या
१८२ महाविद्यालये कार्यरत आहेत.[२]
नांदेड जिल्ह्यांच्या सलग्न जिल्हा
सीमा[संपादन]
नांदेड जिल्हा हा गोदावरीच्या खोर्यात आग्नेय महाराष्ट्रात वसला
आहे. आदिलाबाद व निझामाबाद (आंध्र प्रदेश), बिदर (कर्नाटक), यवतमाळ, लातूर, परभणी व हिंगोली हे जिल्हे नांदेड जिल्ह्याच्या सीमेस लागून आहेत.
नांदेड जिल्हा महाराष्ट्राला (आग्नेय दिशेच्या बाजूने) कर्नाटक व आंध्र प्रदेश या
राज्यांशी जोडतो.
नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नद्या
व उपनद्या[संपादन]
जिल्ह्याचा उत्तर व ईशान्य भाग
सातमाळाचे डोंगर व मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला असून जिल्ह्याच्या दक्षिण-
नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या मध्य भागातून गोदावरी नदी वाहते, हा प्रदेश सपाट व सुपीक आहे. किनवट
तालुक्यातील डोंगराळ भागात प्रामख्याने सागाची व बांबूची वने आळतात.
बाह्य दुवे[संपादन
तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब
नांदेडचे मुख्य गुरुद्वारा आहे आणि ते सिखांच्या अधिपत्याखालील पाच उच्च जागांपैकी
एक आहेत. हे असे स्थान आहे जेथे श्री गुरु गोबिंदसिंहजींनी आपला शेवटचा श्वास
घेतला. नांदेड शहरात गुरुद्वारा आहे. गुरुद्वाराची निर्मिती पंजाबचे महान शासक
महाराज रणजितसिंहजींनी 1830 ते
1891 दरम्यान
बांधले. गुरुद्वाराच्या आत, ज्यामध्ये
10 व्या गुरूंचे
मर्त्य अवशेष आहेत, तेथे
अनेक प्रकारचे शस्त्रे प्रदर्शित होतात.
विमानाने
सर्वात जवळचे विमानतळ श्री गुरु गोबिंद सिंह जी विमानतळ, नांदेड गुरुद्वारापासून 4 किमी अंतरावर आहे
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक हजूर साहिब नांदेड रेल्वे स्टेशन, गुरुद्वारा पासून 1 किमी अंतरावर आहे
रस्त्याने
नांदेड बस स्टँड गुरुद्वारापासून साधारण 1.5 किमी दूर आहे
******************************************************************************
माहूर
एक महान
तिर्थक्शेत्र व महाराष्ट्रातील शक्तिपीठ मानले जाते. रेणुका देवीचे मंदिर
शहरापासुन सुमारे 2.415 किमी अंतरावर
नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या यादवाचा राजा यानी देवीचे
मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. दरवर्षी दसर्याच्या
दिवशी रेनुकदेवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो.
दुसरे शक्तिपीठ- श्री रेणुकामाता
(माहूरगड)
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी
एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय.
श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक
परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन
राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी
भाविकांची श्रद्धा आहे.
आख्यायिका-
एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले. त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस. परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते.
परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ऊर म्हणजे गाव ते माऊर आणि पुढे माहूर झाले..!!
एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले. त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस. परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते.
परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ऊर म्हणजे गाव ते माऊर आणि पुढे माहूर झाले..!!
विमानाने
जवळचे विमानतळ 100 किमी अंतरावर नांदेड विमानतळ आहे
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्टेशन 50 किमी अंतरावर किनवट रेल्वे आहे.
रस्त्याने
नांदेडवरुन सतत बसची सेवा उपलब्ध आहे
*********************************************************************************
माळेगाव :खंडोबा यात्रा
मालेगांव लोहा तालुक्यात आहे. हे गाव
भगवान खंडोबाच्या सन्मानार्थ अतिशय मोठ्या मेळाव्यासाठी प्रसिद्ध आहे. “मालेगाव यात्रा” हा
मेळावा मार्गशीष कृ. 14 (डिसें / जाने) मध्ये आयोजित केला
जातो. नांदेडपासून सुमारे 57 कि.मी. अंतरावर मालेगाव हे ठिकाण आहे.
ही यात्रा पशु बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. घोडे, गाढवे, उंट इ. मोठ्या संख्येने जातात. हजारो सामान्य लोक
भेट देतात.
विमानाने
जवळचे विमानतळ मालेगाव येथून 50 किमी अंतरावर नांदेड विमानतळ आहे
रेल्वेने
माळेगांव पासून जवळचे रेल्वे स्टेशन 50 किमी दूर आहे
रस्त्याने
नांदेड येथून वारंवार येणारी बस आहे
सहस्र कुंड धबधबा किनवट
प्रत्यक्ष पाहण्यासाठी यु तट्यूब लिंक
https://www.youtube.com/watch?v=jxUT8hufaSo
यवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहते. तिचा उगम बुलढाणा
जिल्ह्यात झाला असून, ती पुढे वर्धा नदीला मिळते. उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीवर सहस्ररकुंड धबधबा आहे. नांदेडपासून अंदाजे १२५ कि.मी. दूर असलेला हा
धबधबा नांदेड-किनवट मार्गावर ’इस्लापूर पाटी’पासून ५ कि..मी., तर किनवटपासून सुमारे ५० कि.मी .अंतरावर आहे.[१]
माहिती
नदीचा प्रवाह एका मोठ्या खडकामुळे
विभागला आहे, त्यामुळे पाणी खाली कोसळताना दोन
वेगवेगळ्या धारा पडतात. नदीच्या अलीकडील पात्रात कोसळणार्या धारेचा हा सर्वांत
मोठा धबधबा आहे. मराठवाडा आणि विदर्भाचे विभाजन करणार्या पैनगंगा नदीवरील हा धबधबा खरोखरीच नयनरम्य आहे. अंदाजे
३०-४० फूट उंची वरून कोसळणारा हा धबधबा आपले खरे रोद्र रूप धारण करतो ते
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात. डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा प्रत्येक वेळी आपले
वेगळे रूप दाखवतो. पैनगंगेच्या मराठवाड्याच्या बाजूकडून दुधाचा महापूर भासणारा एकच
धबधबा दिसतो. .हा धबधबा अगदी १५-२० फुटावरून पाहता येतो . खडकावरील शेवाळ्यामुळे खूप
जवळ जाणे धोक्याचे असले तरी थोडी काळजी घेतली तर खडकावरवर बसून पाण्याचे तुषार
झेलत अंग ओलेचिंब झालेलेसुद्धा कळत नांही. नदीच्या विदर्भाच्या बाजूकडून मात्र ४
-५ अप्रतिम धबधबे पहावयास मिळतात. त्या बाजूला जाण्यासाठी उमरखेड -किनवट
मार्गावरील बिटरगावहून आत जावे लागते. धबधब्याजवळ छोटासा बगीचा असला तरी
पर्यटकांसाठी आवशक सोयी इथे उपलब्ध नसल्यामुळे अतिशय नयनरम्य, नितांत सुंदर परिसर लाभूनही हा धबधबा
दुर्लक्षित राहिला आहे.
********************************************************************
कंधार किल्ला
या किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९०च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचाही शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे.
हा किल्ला १५ एकरात असून त्याच्या भोवती खंदक आहे. रष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज असून अनेक तोफा अजून चांगल्या स्थितीत आहेत.
कंधारचे पूर्वीचे नाव पंचालपुरी असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला अशी आख्यायिका आहे.







खूप सुंदर माहिती.
ReplyDelete